नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाबसह देशातील आठ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ झाली आहे. एका दिवसात नोंदवण्यात आलेल्या कोरोनाच्या ६८,0२0 नव्या रुग्णांपैकी या राज्यातील रुग्णांचे प्रमाण ८४.५ टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. याच वेळी, देशातील लसीकरणाची संख्या ६ कोटींपलीकडे पोहोचली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त, म्हणजे ४0,४१४ इतकी होती. याखालोखाल कर्नाटकात ३0८२, पंजाबमध्ये २८७0, मध्य प्रदेशात २२७६, गुजरातमध्ये २२७0, केरळमध्ये २२१६, तमिळनाडूत २१९४ आणि छत्तीसगडमध्ये २१५३ नव्या प्रकरणांची नोंद झाली. देशातील सध्या कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या ५,२१,८0८ झाली असून ती एकूण संख्येपैकी ४.३३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांमध्ये एकाच दिवसात ३५,४९८ प्रकरणांची वाढ नोंदवली गेली. सध्याच्या कोरोनाबाधितांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांत मिळून ८0.१७ टक्के रुग्ण आहेत, अशीही माहिती मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक, हरियाणा व राजस्थान या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान, देशात ९,९२,४८३ सत्रांमध्ये लसीच्या ६ कोटी ५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
८५ टक्के रुग्ण आठ राज्यांत
Contents hide