नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. एका दिवसात भारतामध्ये सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे भारतामध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३0 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याचे आयएएनएसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झाला. तर १0 कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केली. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणार्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत तर ९९ हजार ५00 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सध्या जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अंत्यंत वेगाने होत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला. जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुसर्या लाटेमध्येच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि सर्वाधिक मृत्यूसुद्धा याच कालावधीमध्ये झाले. २१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.
२२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट
Contents hide