• Sun. May 28th, 2023

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा बीसीसीआयला प्रस्ताव

नवी दिल्ली : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (एचसीए) यंदा आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला आहे. एचसीएच्या मते, कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) जागा बदलण्याची इच्छा असेल, तर ते राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज आहेत.हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनने ट्विट केले, की अशा कठीण काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आयपीएलचे आयोजन सुरळीत व्हावे यासाठी एचसीएने सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

बीसीसीआयने हैदराबादला आयपीएल २0२१चे पर्यायी ठिकाण म्हणून ठेवले आहे. मात्र, बोर्डाकडून यासंबधी कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले. या निर्बंधांनंतर मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. आता महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *