मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.सोनाली कुलकर्णी क्राइम पेट्रोल सतर्क जस्टिस रिलोडेड या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. होस्ट म्हणून, सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचा इशारा देणार आहे. तसचं विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे.
या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, मी नुकतेच क्राइम पेट्रोलच्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे.५ एप्रिल पासून सोनाली या नव्या भूमिकेच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत
Contents hide