• Wed. Jun 7th, 2023

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर

अमरावती : श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षपदी राज्याच्या महिला बालविकास मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची, तर चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची एकमताने निवड झाली. संत गाडगेबाबा यांच्या संस्थेत काम करायला मिळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे, अशी भावना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. संत गाडगेबाबा यांची दशसूत्री, त्यांचे कार्य व विचारानुसार मिशनचे कार्य पुढे नेण्याचा संपूर्ण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितलोंत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषत: आदिवासी, भटक्या विमुक्तांसाठी आर्शमशाळा, वसतिगृहे, बालकार्शम, वृद्धार्शम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त, गोरक्षण इत्यादी उपक्रम राबवले जातात.संस्थेच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी भिवाळी- वज्रेश्‍वरी, जि. ठाणे येथे झालेल्या श्री गाडगे महाराज मिशनच्या सर्वसाधारण सभेत या याबाबत चर्चा होऊन सर्वांनी यशोमती ठाकूर यांची अध्यक्षपदी तर मधुसूदन मोहिते-पाटील यांची चेअरमन पदी एकमताने निवड केली. मंत्री यशोमती ठाकूर यांचे संस्थेच्या कार्यात सदोदित सहकार्य लाभले असून संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगांव जि.अमरावती येथील समाधीस्थळ विकसित करून तिथे शासनामार्फत सोयीसुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोहिते -पाटील हे १९९२ पासून मिशनचे संचालक आहेत. त्यांनी गेली ९ वर्षे मिशनच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. मिशनचे माजी चेअरमन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय कीर्तनकार जिजाबा पाटील सोहोलीकर, राजारामबापू घोंगटे यांचा त्यांना वारसा लाभला आहे.

    मिशनची नूतन कार्यकारिणी


उपाध्यक्ष-उत्तमराव देशमुख, सचिव- विश्‍वनाथ नाचवणे, सचिन घोंगटे. खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील. सदस्य-अश्‍विनभाई मेहता,मारोती शिंदे,चंद्रकांत माने, विजय औटी, सुनील बायस्कर, चंद्रकला पाचंगे हे आहेत.यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्‍वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *