मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शरद पवारांनी निवासस्थानीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने हे उपस्थित होते.
१ मार्च रोजी शरद पवार यांनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. जे. जे रुग्णालयाच्या परिचारिका र्शद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल पवारसाहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते.
शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
Contents hide