• Tue. Jun 6th, 2023

‘व्हिटॅमिन डी’ हवेच..!

व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक आहे हे आपण जाणतो. मस्तिष्क यंत्रणा, नर्व्हस सिस्टीम आणि स्केलेटन सिस्टीममध्ये सुसूत्रता राखण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो. व्हिटॅमिन डी मुळे दृष्टी सुधारते त्याचबरोबर सोरायसिस आणि एक्झमा या सारख्या व्याधींपासून मुक्ती मिळते. या व्हिटॅमिनमुळे कंठ, तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही शरीराचा बचाव होतो.
व्हिटॅमिन डी मुळे हाडांना मजबुती मिळते त्याचप्रमाणे मांसपेशींवरची सूज, जळजळ कमी होऊन पेशींच्या विकासासाठी मदत होते. व्हिटॅमिन डी मुळे प्रजननक्षमता सुधारते त्याचप्रमाणे विविध व्याधींची तीव्रताही कमी होते. स्तनाचा कर्करोग अथवा श्‍वासनलिकेत संसर्ग उत्पन्न झाल्यास गंभीर संकट उभं राहू शकतं. मात्र व्हिटॅमिन डी चा पर्याप्त पुरवठा असल्यास व्याधी गंभीर रुप धारण करत नाही. या व्हिटॅमिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अधिकाधिक काळ सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा. व्हिटॅमिन डी अभावी जाडी वाढते. गर्भवती महिलांना व्हिटॅमिन डी ची कमतरता भासली तर भ्रुणाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. हे व्हिटॅमिन मिळवण्यासाठी दूध, दही, मासे, कॉडलिव्हर ऑइल अथवा व्हिटॅमिन डी सप्लीमेंट आहाराचा समावेश करावा. दररोज या घटकांचा योग्य खुराक घेतला गेला तर शरीराला अनेक लाभ मिळतील आणि शारीरिक यंत्रणा सुरळत सुरू राहणं शक्य होईल.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *