अमरावती : रंगोत्सव २०२१ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी गुणवतिता विकास मंच द्वारा आयोजित राज्यस्तरीय विनोदी काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या काव्यगायनाला मुंबई, सिंधुदुर्ग,कोल्हापूर पुणे सह राज्यातील सर्व जिल्हयातून कवींनी हजेरी लावली या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मा.प्रविणजी सोनवणे वर्हाडी कवी स्तंभलेखक निवेदक तर उद्घाटक म्हणून
मा.खुशालजी गुल्हाणे अमरावती सुप्रसिध्द वर्हाडी कवी तर प्रमुख अतिथी म्हणून देवराव चव्हाण सर महादेव निमकर सर राज्यसमुहप्रमुख विद्यार्थी गुणवत्ता मंच हे उपस्थित होते.
होळी व रंगपंचमी वर आधारित विनोदी कविता कवींनी सादर केल्या तर प्रविण सोनवणे यांची माह्यी साई स्टॅन्डवर आली व खुशाल गुल्हाणे सरांची नोकरीपायी बिन करून टाकल लगन ही कवितेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला या काव्यसंमेसनात सर्वोत्कृष्ट कविता सुमन सायमोते मुंबई यांची ठरली तर उत्कृष्ट कविता संजय राठोड सर बाभुळगांव यांची ठरली प्रथम क्रमांक सुवर्णां शिंगोटे पुणे द्वितीय क्रमांक विकास वालावलकर सिंधुदुर्ग , कल्याणी मादेशवार यवतमाळ , व दिलीपराज आवळे कोल्हापूर यांना विभागून देण्यात आला तर तृतीय क्रमांक ओंकार राठोड यवतमाळ रेखा गायकवाड, कोल्हापूर व अशोक राऊत यवतमाळ यांना विभागून देण्यात
आला तर प्रोत्साहनपर क्रमांक के व्ही बिरूगणी कोल्हापूर वंदना कोषटवार यवतमाळ व अश्विनी गट पुणे यांना देण्यात आला या
काव्यसंमेलनात राज्यातील एकूण २५ कवींनी सहभाग घेतला काव्यसंमेलनाचे संचलन कविता सव्वालाखे मॅडम यवतमाळ यांनी केले तर आभारप्रदर्शन सुवर्णां शिंगोटे मॅडम पुणे यांनी केले.
विद्यार्थी गुणवत्ता मंचच्या राज्यस्तरीय विनोदी स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद
Contents hide