अमरावती : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अमरावती मध्ये मात्र कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे . त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निबर्ंध शिथिल करण्यात यावे तसेच लॉकडाउन बाबत पुनर्विचार करण्यासंदर्भात अमरावतीच्या आ.सौ .सुलभाताई खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र देऊन दूरध्वनीवरून संवाद साधला.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने कोरोना प्रतिबंधासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सारखे कडक निबर्ंध लागू केले आहे. ज्यामध्ये शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यापारी आस्थापना व सर्व दुकाने ३0 एप्रिल पयर्ंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहे. या आदेशाची अंबलबजावणी करण्याला घेऊन राज्यातील त्या – त्या जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन चे आदेश जारी केले आहेत . अमरावती जिल्ह्यात याची अंबलबजावणी होत असली तरी लॉकडाऊन लागू झाल्याने व्यापारी व कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
गतवर्षीच्या लॉकडाऊन नंतर व्यापार अजूनही पूर्वपदावर आला नसून सर्वसामान्यांची विस्कटलेली आर्थिक घडी सुद्धा अजूनपयर्ंत सुरळीत झाली नाही. असे असतांना मात्र ६ एप्रिल ते ३0 एप्रिल पयर्ंत अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन सारखे कडक निबर्ंध लागू झाल्याने कामगार व व्यापारी वगार्ने रस्त्यावर उतरून लॉक डाऊनला विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन अमरावती जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.
लॉकडाऊनला शिथिलता देऊन कडक निर्बंधातून सूट द्यावी-सुलभाताई खोडके
Contents hide