लॉकडाऊनला अमरावतीकरांचा तीव्र विरोध

अमरावती:५ एप्रिल पासुन राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यत कडक लॉकडाऊनची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. राज्या शासनाच्या या निर्णया विरोधात अमरावती जिल्हयातील व्यापार्‍यांनी कडक विरोध दर्शविला असून जिल्हयात सर्वकाही स्थिर असून कोरोना रुग्ण व मृतकांची संख्या ही कमी होत असतांना जिल्हयात लॉकडाऊनची आवश्यक्ता का असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

राज्यात कोरोना रुग्णांची दुसरी लाट हा भयावह असतांना अनेक शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठी संख्या आहे अशा ठिकाणी राज्य सरकाने लॉकडाऊन लावणे गरजेचे आहे मात्र अमरावती जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असतांना लॉकडाऊनची अवश्यक्ता नसल्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाला व्यापारीसह जनसामान्याचाही तिव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे नागरिकांच्या रोजगारासह पोटापाण्याचा प्रश्न गंभिर झाला असून सततच्या वाढत्या महागाईमुळे जनसामन्याचे कंबरडे पूर्णताह मोडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या निर्णयाविरोधात पनर्रविचार करावा अशी मागणी अमरावतीकरांनी केली आहे.