मुंबई : जर तुम्हाला रोमँटिक चित्रपटांचा शौक असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार २0 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या रेहना है तेरे दिल में या रोमँटिक चित्रपटाचा सिक्वल बनणार आहे. पण यावेळी या चित्रपटात रीनाची भूमिका साकारणारी दीया मिर्झा मुख्य भूमिकेत दिसणार नाही. असं म्हणतात की, या भूमिकेसाठी ताज्या दमाची अभिनेत्री कृती नाव चर्चेत आहे. तर उर्वरित कलाकारांबद्दलही बोलणी सुरू असल्याचे समजते आहे.
रहना है तेरे दिल में हा चित्रपट न पाहिलेला चूकूनच कुणीतरी सापडेल. अभिनेता आर. माधवन, सैफ अली खान आणि अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट हिंदी सिनेमा जगतातील कल्ट रोमांस चित्रपटांमध्ये गणला जातो. चित्रपटाने लोकांच्या हृदयाला अशा प्रकारे स्पर्श केला की आजही चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि गाणी ताजी टवटवीत वाटतात. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कृती सेनन यांना या चित्रपटात कास्ट केल्याच्या वृत्त समोर आलं आहे.
विकी आणि कृती सध्या रहना है तेरे दिल में च्या सिक्वल विषयी चर्चा सूरू आहे. कृतीने लीड रोलसाठी रस दाखविला आहे तर चित्रपटाच्या संदर्भात विकीलाही संपर्क साधण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपट निर्मात्यांना फ्रेश चेहर्यांचा शोध आहे. अशातच कास्टींग डायरेक्टरने कृती आणि विकी यांचे नाव सुचवले. दोन्ही स्टार्सना चित्रपट करण्यास रस आहे आणि आता फायनान्स आणि शूटिंगच्या तारखांवर काम सुरू आहे. २0२२ च्या अखेरीस चित्रपटाचे काम सुरू होईल. पेपरवर्क अजून बाकी आहे, अशी माहिती समजते आहे.
‘रेहना है तेरे दिल में’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.!
Contents hide