• Mon. Jun 5th, 2023

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत साडेतेरा लाखाची फसवणूक

वर्धा : रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे सांगत वध्र्यातील महिलेला तब्बल १३ लाख ५0 हजारांचा गंडा घालण्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांत मयुर वैद्य रा. बालाजी मंदिराजवळ बल्लारशा आणि रवींद्र गुजरकर रा. दाते मंगल कार्यालयामागे वर्धा, यांचा समावेश आहे. याबाबतची तक्रार क्वालिटी ड्रग्ज या एजंसीत मार्केटिंग सेलमध्ये काम करणार्‍या सुनिता देहारे (वय ४४) यांनी शहर पोलिसांत दाखल केली.
विजय गुजरकर आणि रवींद्र गुजरकर हे सख्खे भाऊ आहेत. विजय गुजरकर हा क्वालिटी ड्रग्जमधून मेडिकलचे साहित्य न्यायला यायचा. त्यातून या महिलेची आणि त्याची ओळख झाली. त्यातच रवींद्र गुजरकर हा या महिलेला बसस्थानकात भेटला असता कोणाला नोकरीची गरज असल्याचे सांग, असे त्याने म्हटले.सोबतच मी माज्या मुलाला रेल्वेत टीसीची नोकरी लावली. त्याकरीता साडेनऊ लाख रुपयांचा खर्च आल्याचेही सांगितले. या महिलेला मयुर वैद्य हा माज्या ओळखीचा आहे असे सांगून तो आपले काम करून देईल, असे आश्‍वासन दिले. त्याकरीता पुरी येथे जावे लागेल, तेथे मयुर वैद्य तुम्हाला भेटेल, असे सांगितल्याने मुलीला घेऊन सुनिता देहारे या पुरी येथे गेल्या होत्या.

तेथे ठरल्याप्रमाणे मयुर वैद्य त्यांना भेटला. त्याने मुलीला वैद्यकीय तपासणीस पाठविले. वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतर तुमच्या मुलीला नियुक्तीपत्र मिळेल, असेही त्याने सांगितले. पण रिपोटिर्ंगकरीता रांची झारखंड येथे जावे लागेल, असे म्हणत, पैशाची मागणी केली. त्यामुळे त्याला २ लाख रुपये दिले. त्यानंतर वध्र्यास परत आल्यावर मयुर वैद्य याच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी लागेल, त्यानंतर नियुक्तीपत्र मिळेल, असे सांगितले. त्यानुसार महिलेने एकूण १३ लाख ५0 हजार रुपये दिले पण जुलै २0१८ पासून नियुक्तीपत्र मिळालेच नाही. अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांचेमार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

(Images Credit : Lokmat)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *