वर्धा:जिल्ह्य़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असणार्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या वतीने इंजेक्शन पुरविण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात पर्याप्त प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन व आवश्यक औषधी उपलब्ध असून, जिल्ह्य़ात औषधांचा तुटवडा असल्याच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पर्याप्त प्रमाणात खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, कोविड रुग्णांना बेड उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या व्यवस्थापनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाच्या 0७१५२ २४३४४६ दूरध्वनी क्रमांकावर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास कोणत्या रुग्णालयात किती बेड रिक्त आहे.
कोणत्या डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यांचे नाव व त्यांचा दूरध्वनी क्रमांक प्राप्त होणार आहे. उपचाराशिवाय एकही रुग्ण वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने कारवाई व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.
तसेच सेवाग्राम व सावंगी मेघे येथे अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असून लवकरच कोविड रुग्णांच्या उपचाराकरीता जास्तीचे बेड उपलब्ध होणार आहे. मात्र आवश्यक रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येईल यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी आग्रह करु नये, असेही आवाहन प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
नागरिकांनी कोविड-१९आजारासंबधी रुग्णालयात दाखल होण्याकरिता बेड उपलब्धतेकरिता जिल्हा स्तरावरील ी२ी५ं६ं१ँिं.्रल्ल या संकेत स्तरावर भेट देऊन माहिती जाणून घ्यावी तसेच बेड व्यवस्थापन कॉल सेंटरच्या 0७१५२-२४३४४६ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल.
रेमडेसिवीर तुटवड्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवूनये -जिल्हाधिकारी
Contents hide