नवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची दुसर्या लाट लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांच्यासाठी अधिक धोकायदायक ठरत आहे.
या अगोदर आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु आता मात्र लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिला यांची संख्या अधिक आढळते. हा चिंतेचा विषय आहे, असे दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी एका मीडियाशी बोलताना म्हटले. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमणाची परिस्थिती अधिक चिंताजनक बनली. मंगळवारी दिल्लीत एकूण ५१00 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठा ठरलाय. आतापर्यंत दिल्लीत ६ लाख ८५ हजार 0६२ जणांना कोरोना संक्रमणाने गाठले. यातील १७ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ११ हजार ११३ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळेच दिल्लीत कडक निबर्ंध घालण्यात आले आहेत. दिल्ली सरकारकडून ३0 एप्रिलपयर्ंत रात्री १0 ते सकाळी ५ वाजेपयर्ंत नाईट कफ्यरू लागू करण्यात आला. तसेच दिल्लीत कोरोना लसीकरण मोहीम २४ तास सुरू ठेवण्यात आले. तर देशातील कोरोना आकडेवारी लक्षात घेतली असता कोरोना संक्रमणाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडल्याचे दिसून येते. मंगळवारी एकाच दिवशी देशात रेकॉर्डब्रेक लाख १५ हजार ३१२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत ६३0 मृत्यूंची नोंद करण्यात आली.
रुग्णांत लहान मुले, तरुण, गर्भवतींची संख्या अधिक
Contents hide