• Wed. Sep 27th, 2023

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

मुंबई:भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पतधोरणाचा आढावा जाहीर केला. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के कायम राहील. एमपीसीची तीन दिवसीय बैठक ५ ते ७ एप्रिल दरम्यान झाली. एमएसएफ आणि बँक दरात कोणताही बदल झाला नाही , ते ४.२ टक्के कायम राहतील. ग्राहक किंमत निर्देशांकाचा आलेख चढत्या आणि उतरत्या दबावावर अवलंबुन असेल. २0२0-२१ मधील विक्रमी अन्नधान्य उत्पादनामुळे डाळींच्या किमती कमी होतील, असे गवर्नर म्हणाले.
लसीकरण कार्यक्रमामुळे आर्थिक वर्ष २0२१-२२ मध्ये वाढीला चालना मिळेल. मात्र अलिकडेच संक्रमणात वाढ झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अनिश्‍चितता निर्माण झाली असून बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. चलनवाढीच्या विकसनशील दृष्टिकोनाचे बारकाईने निरीक्षण करत असताना, शाश्‍वत सुधारणा दिसेपयर्ंत पतधोरण भूमिकेची जैसे थे स्थिती कायम राहील, असे त्यांनी सांगितले. भारतात संक्रमणात वाढ झाल्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आता आपण अधिक चांगल्या प्रकारे सज्ज आहोत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,