हिंगणघाट : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मोठमोठाल्या पदांच्या स्वप्नासोबत खाकी वर्दीच स्वप्न पाहणारे बहुतांश विद्यार्थी अंगावर खाकी येण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जीवाची माती करताना दिसतात. वास्तव्यात साकारणार्या हिंगणघाट शहरातील गाडगेबाबा या जुन्या वस्तीत राहणार्या वर्षा ऊर्फ राणी तांदूळकर या मुलीने पदवीच्या शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले.
घरची गरिबीची परिस्थिती असताना तिने शहरातील सक्सेस गायडन्स पॉइंट व विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यासाला सुरुवात केली, नियमित मिळणार मार्गदर्शन व चिकाटी यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तिने अनेक परीक्षा दिल्या. मार्च २0१९ ला एमपीएससी परीक्षेतील अराजपत्रित पदांच्या निकालात वर्षा यशस्वी झाली एकवर्षाच्या ट्रेनिंगनंतर वर्षाला नागपूर विभागातील नियुक्ती मिळाली असून येत्या काही दिवसात वर्षा नागपूर विभागांतील पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू होणार आहे.
राणी तांदुळकर पहिल्याच प्रयत्नात बनली पोलिस उपनिरीक्षक
Contents hide