मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असून, यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी राज यांनी केली असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही ते भेट घेणार आहेत. असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असेही राज यांनी म्हटले आहे.
मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांना संताप अनावर झाला. माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचे नाव आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे. त्यामध्ये नजीम मुल्लांचे नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असे या प्रेसनोटमध्ये म्हटलेले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लांचे नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आले होते. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आले आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला खणखणीत इशारा
Contents hide