राज्यात वीकेंड लॉकडाऊन-नवाब मलिक

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची रविवारी बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल आणि इतर दिवशी कडक निबर्ंध असतील अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ३0 एप्रिलपयर्ंत कडक निबर्ंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात आठवड्याला लॉकडाऊनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजार्‍यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर कोणतेही निबर्ंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी सांगितले. शासकीय कार्यालये ५0 टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून, कामगारांवर बंधने नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहतील. मंडईत निबर्ंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपयर्ंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. सोमवार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपयर्ंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केली. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपयर्ंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, असेही मलिक यांनी सांगितले. मागील काही दिवसांत कोरोनाने अक्षरक्ष: थैमान घातल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगाने होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरुवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निबर्ंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात सोमवारपासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.