यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणारी सर्व सामान्य परिवारातील कु. स्नेहल सुरेंद्र चव्हाण ही उद्या सोमवार दि. ५ एप्रिल ते बुधवार पयर्ंत कलर्स मराठीवर रात्री ९.३0 वाजता सुर नवा ध्यास नवा या मालिके अंतर्गत आपल्या सुमधूर गितांची प्रस्तुती करणार आहे. कु. स्नेहल चव्हाण हिने या अगोदर २0१८ मध्ये वॉईस ऑङ्ग विदर्भ, २0१९ मध्ये यवतमाळ आयडॉल, २0२0 मध्ये शिवर% संगीत सम्राट तर इंडियन आयडॉल मध्ये टॉप ५0 मध्ये संपूर्ण विदर्भात प्रवेश घेण्याचा मान कु. स्नेहल चव्हाण हिने पटकाविला आहे. कु. स्नेहल चव्हाण हिचा जन्म मध्यमवर्गीय कुटूंबात झाला असून तिच्या आई वडीलाना संगिताची आवड होती. आई नेहमी लहान पणापासून भजनांच्या कार्यक्रमात घेऊन जायची आणि तेथूनच स्नेहल चव्हाण हिचा संगीतमय प्रवास प्रारंभ झाला असून राज्यस्तरीय सत्यसाई बाल भजन महोत्सव अहमदनगर येथून संगीताच्या क्षेत्रात प्रवेश करुन लहान पणापासून कु. स्नेहल चव्हाण ने मनात जिद्द अंगीकारली होती कि, मी टिव्हीवर झळकणार आणि आज कु. स्नेहल चव्हाणचे स्वप्न साकार होत असून तिचे स्वप्न यशस्वी ठरो याकरिता आम्ही आपलेच टिमचे सतीश राठोड, विजय कुमार बुंदेला, बाळासाहेब सज्जनवार, गोपाल ढोमणे, सिने अभिनेत्री सरला इंगळे, दीपीका गंगमवार, सुधीर कैपिल्यवार, पूजा गुगलिया नेर, शैलेश करिहार, अश्वविता वाढवे, भाग्यश्री गटलेवार, विद्याताई खडसे आदिंनी तिला या उज्वल भविष्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यवतमाळची गायिका स्नेहल आज कलर्स मराठीवर
Contents hide