• Sat. Jun 3rd, 2023

मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, किरण मोरेंना कोरोनाची लागण

मुंबई : आयपीएलच्या नव्या सत्राचे उद््घाटनाचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंर्जस बेंगळुरू यांच्यात ९ एप्रिलला चेन्नईत रंगणार आहे. मात्र, या सामन्याला काही दिवस उरले असताना मुंबईच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे यष्टीरक्षण प्रशिक्षक किरण मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत ही माहिती दिली.
किरण मोरे यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सर्व सूचनांचे ते पालन करत आहेत. मुंबई इंडियन्सचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे, असे मुंबईने आपल्या ट्विटमध्ये सांगितले.
भारतीय यशस्वी यष्टीरक्षकांच्या यादीत किरण मोरे यांना गणले जाते. मोरे यांनी १९८४ ते १९९३ च्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत यष्टीमागे दमदार कामगिरी केली. त्यांनी ४९ कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून १३0 तर, वनडेत ९0 फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून नवृत्ती घेतल्यानंतर मोरे यांनी २000-२00६ पयर्ंत बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यपद सांभाळले होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *