• Fri. Jun 9th, 2023

मास्टरचा रिमेक, सलमान साकारणार विजयची भूमिका?

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट मास्टर हा जानेवारी महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. कोरोना काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार आहे. त्यात विजयची भूमिका बॉलिवूडचा भाईजान सलमान खान साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.मास्टरचा रिमेक हा कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एन्डेमोल शाइन करणार आहेत. मुराद आणि एन्डेमोलच्या टीमने सलमानची गेल्या ३0 दिवसांपासून मास्टरविषयी चर्चा करण्यासाठी अनेकदा भेट घेतली आहे. या चित्रपटाची संकल्पना सलमानला आवडली आहे आणि त्याने या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. तर, मास्टरची टीम हिंदीमध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे येण्याची तो वाट पाहत आहे, कारण तामिळ भाषेत असलेल्या या मुळ चित्रपटाचे बॉलिवूडच्या प्रेक्षकांसाठी काही बदल करावे लागणार.

मास्टर या चित्रपटात विजयने ज्या प्रमाणे प्रेक्षकांना शेवट पयर्ंत धरून ठेवले. तशी भूमिका बॉलिवूडमधील काही मोजकेच अभिनेते करू शकतात आणि सलमान त्या भूमिकेसाठी योग्य असून चित्रपटाच्या टीमची पहिली पसंत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि निर्मात्यांमध्ये सुरू असलेली चर्चा ही अगदी सुरूवातीच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर सलमान चित्रपट करण्याचा निर्णय घेईल. मास्टरची टीम सध्या मुळ स्किप्टमध्ये बॉलिवूड प्रेक्षकांना आवडतील असे बदल करत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये सलमानला या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला मिळू शकते. सलमान सध्या टायगर ३ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. जर सलमानने मास्टरच्या हिंदी रिमेकसाठी होकार दिला तर कभी ईद कभी दिवालीनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण करेल. तर या वर्षी ईदला सलमानचा राधे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *