चांदूर रेल्वे:चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात वाघाने गायीचे वासरू खाल्ल्यामुळे त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी भारत केशवराव बोबडे यांनी शनिवारी चांदूर रेल्वे वनविभागात निवेदन देऊन केली आहे.तालुक्यातील मांजरखेड (कसबा) – तरोडा शिवारात असून भारत बोबडे यांचे शेत आहे. या शेतात गायीचा गोठा असुन तिथे जनावरे बांधलेले असतात. अशातच १ एप्रिल रोजी रात्री गोठ्यातील एक वासरू वाघाने ओढत नेऊन खाल्ल्याचे निवेदनात नमुद आहे. दुसर्या दिवशी २ फेब्रुवारी रोजी भारत बोबडे शेतात गेले असता गोठ्यातुन वासरू कोणीतरी घेऊन गेल्याची शंका मनात आल्याने त्यांनी थोडा शोध घेतला असता शेतामध्येच वासराला ओढत नेल्याचा मार्ग दिसला. त्याची पावले सुद्धा दिसून आले, त्या मागार्ने शोध घेतला असता शेताबाहेर वासराला खाल्ल्याचे दिसले. तसेच त्यांना वाघ सुध्दा दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकर्याने केली आहे. या वाघाच्या चचेर्मुळे शेतकरी व मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे मजूर शेतात कामावर येण्यासाठी नकार देत असून शेतीतील भाजीपाला कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करून शेतकर्यांचा व गुराढोराचा येणार्या काळात जीव कसा वाचविता येईल हे आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याची मागणीही वनविभागाकडे केली आहे.
मांजरखेड कसबा परिसरात वाघाने फस्त केले वासरू
Contents hide