मुंबई : महेंद्रसिंग धोनीची चिंता आयपीएलपूर्वीच वाढली आहे. कारण दोन खेळाडूंनी आता चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये संघाची बांधणी कशी करायची, हा मोठा प्रश्न धोनीसमोर नक्की असेल.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने यावर्षी चेन्नईकडून खेळण्यास यापूर्वीच नकार दिला होता. कौटुंबिक कारणांमुळे आपण आयपीएल खेळणार नसल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर चेन्नईचा संघ हेझवूडच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान देता येईल, याचा विचार करत होता. त्यासाठी चेन्नईच्या संघाने दोन वेगवान गोलंदाजांना विचारणार केली होती. पण या दोन्ही गोलंदाजांनी चेन्नईकडून खेळण्यास नकार दिला आहे. हेझवूड खेळणार नसल्याचे समजल्यावर चेन्नईच्या संघाने सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बिली स्टनलेकपुढे प्रस्ताव ठेवला होता. पण स्टॅनलेकने चेन्नईच्या संघाचा हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यानंतर चेन्नईच्या संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपलेशी संपर्क साधला आणि त्याला संघात येण्याबाबत विचारणा केली होती. पण टॉपलेनेदेखील चेन्नईच्या संघाला नकार दिला आहे.
या दोघांनीही कोरोनाचे कारण पुढे केले असल्याचे समजते आहे. कोरोना भारतामध्ये आता वाढत असल्यामुळे त्यांनी आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा एका सदस्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
महेंद्रसिंग धोनीला मोठा धक्का
Contents hide