नवी दिल्ली : आमच्या सरकारचे मूल्याकंन लोकांना दिल्या जाणार लाभावरून केले जात आहे. देशातील सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा हा मूलमंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी ते बोलत होते.
भाजपा सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांची, योजनांची माहिती देतानाच मोदी यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली. निवडणुकांमधील विजयावरून भाजपावर होणार्या टीकेलाही पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले. भाजपा निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मने जिंकण्याचे अभियान आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर पलटवार केला. भाजपाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, मागील वर्षी कोरोनाने संपूर्ण देशसमोर अभूतपूर्व असे संकट उभे केले होते. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपले सुख-दु:ख विसरून देशवासीयांची सेवा केली. सेवा हेच संघटन याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केले. गांधीजी म्हणायचे समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला लाभ होईल तेच निर्णय आणि योजना आहे. गांधींजींच्या त्याच भावनेला पूर्ण करण्यासाठी आपण पर्शिम घेत आहोत, असे मोदी म्हणाले.
मतदार सरकारचे मूल्यांकन करतात
Contents hide