यवतमाळ : आरोग्य वर्धीनी केंद्र बोदेगांव येथे लसीकरणाचे उद््घाटन जि.प. अध्यक्षा कालिंदाताई यशवंत पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती श्रीधर मोहोड तर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. हरी पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, सुनिता राऊत पं.स. सभापती, नामदेव जाधव उपसभापती, संतोष ठाकरे सदस्य, उमीता राठोड सरपंच बोदगांव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांगकिन्ही येथील लसीकरण केंद्राला भेट देण्यात आली. दारव्हा पं.स.ला लसीकरण, पाणीटंचाई व इतर कामाबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी कोविड संदर्भात नियमाचे पालन करावे, ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. काही आजार असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार यांनी केले.