नवी दिल्ली:जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येत्या दोन आठवड्यांत जागतिकस्तरावर दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होईल, असा अंदाज अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकन टेलिव्हिजन चॅनेल एनबीसीच्या मीट द प्रेस शोमध्ये मिनेसोटाच्या सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसिज रिसर्च अँड पॉलिसीचे संचालक मायकेल ऑस्टरहोलम म्हणाले की, जागतिकस्तरावर कोरोना विषाणूचा धोका पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे.
येणार्या काळात संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या मोठी वाढ होईल आणि कोरोनाचा प्रसार झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असेल. ते म्हणाले, की माज्या मते सध्या संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या प्रकरणात पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळाचा सामना करत आहे. पुढच्या दोन आठवड्या आपल्याला असे जाणवेल, की कोरोनाचे रोज समोर येणारे रुग्ण आजाराच्या प्रसारापासूनचे सर्वाधिक रुग्ण असतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या डिसेंबर २0२0 मध्ये आढळून आली होती. लसीकरण सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली. मात्र, भारत, अमेरिका, ब्राझील, इटली आणि र्जमनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे.
अमेरिकी आरोग्य विशेषतज्ज्ञ म्हणाले, की अमेरिकेबद्दल बोलायचे झाल्यास, आता केवळ रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पुढे ही संख्या आणखी वेगाने वाढणार आहे. चिंताजनक बाब म्हणजेच भारतात शुक्रवारी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. टक्केवारीनुसार पाहिल्यास भारतात अमेरिकेपेक्षाही अधिक रुग्णसंख्या आढळत आहे. मागील ५0 दिवसात कोरोना रुग्णसंख्येत दहा पटीने वाढ झाली आहे. हे आकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केले आहेत. जागतिक स्तरावर मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक नोंदवली गेली होती. जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या कोरोना वायरस रिसोर्स सेंटरच्या म्हणण्यानुसार, जगभरातून आतापयर्ंत १३ कोटीहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, २८.४ लाखाहून अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.