• Mon. Jun 5th, 2023

पिळदार शरीरयष्टीसाठी..

दोस्तांनो, शरीर पळदार बनण्यासाठी वर्षाेनवर्ष कष्ट घ्यावे लागतात. एकदा मनासारखं शरीर घडलं की ते टिकवण्यासाठीदेखील व्यायामाला पर्याय नाही. यासाठी तुम्हाला सतत व्यायामाचं पथ्य पाळावं लागेल. या प्रयत्नात असणार्‍यांसाठी उपयुक्त टिप्स.
शरीर कमावण्याच्या प्रयत्नात असाल तर प्रथम शरीराची योग्य तपासणी करून घ्या. डॉक्टरांकडून शरीराची नेमक स्थिती आणि त्यानुसार उपयुक्त व्यायाम प्रकारांची माहिती घ्या.
चांगला प्रशिक्षक मिळाला, जीममधील वातावरण चांगलं असलं आणि लोकेशन सुंदर असलं तर तुमचं हे काम अधिक सोपं होऊन जाईल.
ट्रेनिंग पार्टनरसवे व्यायाम करणं हा शरीर कमावण्याचा एक चांगला उपाय आहे. एकमेकांच्या जोडीनं व्यायाम चांगला होतोच त्याचप्रमाणे सतत तुलना आण चढाओढ बघायला मिळाल्यामुळे कसोशीनं प्रयत्न केले जातात. शरीर कमावण्याच्या प्रयत्नात शरीरात कोणताही फरक दिसू लागला अथवा त्रास जाणवू लागला तर तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यायाम प्रकार बदलून फरक पडू शकतो.
वर्कआऊट सेशनमध्ये स्ट्रेचिंग गरजेचं आहे. स्ट्रेचिंगमुळे मांसपेशींना मजबुती मिळते आणि शरीराला लवचिकता प्राप्त होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *