पहिल्या विजयासाठी उतरणार मुंबई इंडियन्स दोन्ही संघ

मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), क्रिस लिन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसन, पीयूष चावला, ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह.
कोलकाता नाइट राइडर्स : ऑयन मॉर्गन (कर्णधार), नीतीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिंस, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा व वरुण चक्रवर्ती.वृत्तसंस्था/चेन्नई
सत्राची विजयी सुरुवात करणार्‍या कोलकाता नाईट रायडर्स संघ आता आयपीएलमध्ये विक्रमी पाच वेळा विजेतेपद पटकावणार्‍या मुंबई इंडियन्ससोबत भिडेल. कोलकाताने सत्राची विजयी सुरुवात केली आणि आपल्या पहिल्या सामन्यात रविवारी सनराईर्जस हैदराबादला १0 धावांनी मात दिली. आता त्यांच्यापुढे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ असेल. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळण्यात येईल. केकेआरविरुद्धचा सामना जिंकून मुंबई गुणतालिकेत आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नईच्या या मैदानावर मुंबई इंडियन्सला सत्रातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंर्जस बेंगळुरूने त्यांना दोन गड्यांनी पराभूत केले होते. मागिल दोन वेळापासून सलग विजेतेपद पटकाणारा मुंबई संघ आता मागिल चुकांमध्ये सुधार करून मैदानावर उतरेल. तर मॉर्गनच्या नेतृत्वातील केकेआर संघ आत्मविश्‍वासाने उतरेल त्यांनी मागिल सामना जिंकला होता. शाहरुख खान मालक असलेल्या केकेआरच्या स्टार फलंदाज नितीश राणा, सलामीवीर शुभमन गिल व राहुल त्रिपाठीवर सर्वांचे लक्ष असेल. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मागिल सामन्यात काही विशेष करू शकला नव्हता या सामन्यात तो चांगले प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
केकेआर संघाल बदल होण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या सर्वच खेळाडूंनी मागिल सामन्यात विजयात आपले योगदान दिले होते. मुंबई संघातही कुठल्याही फिरकीपटूला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण राहुल चाहरने मागिल सामन्यात जास्त धावा लुटवल्या होत्या. त्याने चार षटकात ४३ धावा दिल्या होत्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!