• Fri. Jun 9th, 2023

पश्‍चिम बंगाल निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती आणि जया बच्चन आमने-सामने

कोलकत्ता : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान आता टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या सर्मथनार्थ भाजप विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आधीच ममता बनर्जीसाठी टीएमसी उमेदवारांच्या सर्मथनार्थ सभेचे आयोजन केले होते. आता समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन टीएमसी उम्मीदवारांच्या सर्मथनार्थ सभा आयोजित करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवले आहे.

ममता बँनर्जी यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करणार्‍यांच्या यादीच नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव सामील आहेत. नुकतेच ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून विरोधी दलातील नेत्यांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांचे मंत्री सुब्रत बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले की, जया बच्चन रविवारी रात्री कलकत्त्याला पोहोचल्या. त्या ५ ते ८ एप्रिलपयर्ंत बंगालमध्ये राहतील. कलकत्तात त्या टालीगंज पासून टीएमसीचे उमेदवार अरुप विश्‍वास यांच्या सर्मथनार्थ रोड शो करतील. अरुप विश्‍वास यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे.

    अनेक उमेदवारांसाठी जया बच्चन यांचा प्रचार

सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले की, जया बच्चन ६ आणि ७ एप्रिल रोजी राज्यातील विविध विधानसभेतील टीएमसी उमेदवारांच्या सर्मथनार्थ रोड शो करतील.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *