अमरावती : अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोविड लसीकरण शिबिराला आज उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी, विविध प्रसार माध्यमांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी तसेच वृत्तपत्र वितरक व हॉकर्सनी देखील मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला आहे.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज खापर्डे बगीचा परिसरातील संत गजानन महाराज मंदिरामागील शासकीय केंद्रावर पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांशी निगडीत सर्व कर्मचार्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद््घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे, अरूण जोशी, पॅथालॉजीस्ट डॉ. अमोल नरोटे, सहचिटणीस सुधीर भारती, प्रवक्ता मनोहर परिमल, संजय पंड्या, सुनील तळोकार, अमोल देशमुख, विजय धामोरीकर आदींची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये ४५ वर्षे वय पूर्ण असलेल्या पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी, विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी, वृत्तपत्र वितरक तसेच हॉकर्स यांचे लसीकरण करण्यात आले आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातील शिबिरार्थ्यांची संख्या देखील अधिक होती. यावेळी मोठय़ासंख्येने सहभागी झालेल्या शिबीरार्थ्यांनी पत्रकार संघाचे आभार देखील मानले. या आयोजनाकरिता अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या समस्त कार्य कारिणीसोबतच लसीकरण केंद्रावरील स्टाफ सदस्य किरण केचे, सुजाता खडसे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुविधा कराळे, डाटा ऑपरेटर आकाश चव्हाण, कक्षसेवक कार्तिक काळबांडे, मॅनेजमेंट अधिकारी अमित देशमुख आदींनी पर्शिम घेतले.