नकोशी लव घालवण्यासाठी…

शरीरावर बारीक लव असते. पण ही लव दाट अथवा उठून दिसणारी असेल तर सौंदर्यात बाधा उत्पन्न होते. विशेषत महिलांच्या ओठांवरील लव विचित्र दिसते. त्यामुळेच ती हटवण्यासाठी नियमित वॅक्सिंग अथवा थ्रेडिंगचा पर्याय निवडावा लागतो. पण काही उपायाने हा त्रास कायमस्वरुपी नाहिसा होऊ शकतो. डाळीच्या पिठात डेड स्किन दूर करणारी तत्त्व असतात. म्हणूनच याच्या वापराने ओठांवरील लव दूर करता येते. त्यासाठी चमचाभर डाळीच्या पिठात चमुटभर हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर स्क्रब करुन चेहरा धुवा. सलग दोन आठवडे हा उपाय केल्यास लव कमी झालेली दिसेल. बाऊलमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, चमचाभर साखर आणि एका अंड्याचा पांढरा बलक हे साहित्य एकत्र करा. हे मिर्शण १५-२0 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर धुवा. या उपायानेही ओठांवरील लव नाहिशी होते. नकोशी लव घालवण्यासाठी हळदीचा लेपही उपयुक्त ठरतो. दूध-हळदीचा लेप लावल्यास अपेक्षत परिणाम बघायला मिळतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!