• Wed. Sep 20th, 2023

टायगर र्शॉफच्या हातून गेला मोठा चित्रपट

मुंबई : अभिनेता टायगर र्शॉफने कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला डान्सर म्हणूनही ओळखलं जातं तसंच त्याने अँक्शन हिरो म्हणूनही आपली प्रतिमा निर्माण केली आहे. सध्या त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत, बर्‍याच ऑफिर्सही येत आहेत. मात्र काही मोठे चित्रपट त्याच्या हातून निघून जात आहेत. रॅम्बो हा चित्रपट नुकताच त्याच्या हातातून गेल्याचं कळत आहे.काही वर्षांपासून रॅम्बो चित्रपटाची चर्चा होती. टायगर र्शॉफ या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडला गेला होता. पण आता मात्र या चित्रपटात टायगर दिसणार नाही. या चित्रपटासाठी त्याच्याकडे वेळ नसल्याचं वृत्त माध्यमाने दिले आहे. या वृत्तानुसार, टायगरकडे सध्या अनेक चित्रपट आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या चित्रपटाला वेळ देता येत नसल्याने टायगरने हा चित्रपट सोडल्याचं कळत आहे. त्याऐवजी आता साऊथ सुपरस्टार प्रभास या चित्रपटात दिसणार असल्याचं वृत्त आहे. अजून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषण झालेली नाही. मात्र, प्रभासला कथा आवडली असल्याची आणि ही बातमी पक्की असल्याची चर्चा सुरु आहे.
प्रभास सध्या आपला बहुचर्चित चित्रपट राधेश्याममुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त प्रभास आदिपुरुष या चित्रपटात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर टायगर सध्या वॉर २च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याचबरोबर बागी ४ आणि हिरोपंती २ या चित्रपटातही तो प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,