जिल्ह्य़ात ४ रुग्णांचा मृत्यू, ३४४ पॉझिटिव्ह

अमरावती: जिल्हयात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पहावयास मिळाली असून ७ एप्रिल रोजी ३४४ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी जिल्हयात आतापर्यत ५0 हजार ७२२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ४ रुग्णांचा आज (७ एप्रिल) रोजी मृत्यू झाला असून आतापर्यत ६९२ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे. २ हजार ९६९ रुग्ण हे एॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोविड तसेच क्वारटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. ४७ हजार ६१ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून जिल्हयात ९२.७८ टक्के रिकव्हरी रेट आहे.कोरोना रुग्णांची संख्या जिल्हयात कमी जास्त होत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखिल लॉकडाऊन बाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा व्यापारी, कामगार,व मजुर वर्गानी मोठया प्रमाणात विरोध केला असून या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हयात लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध करणार्‍या व्यापारी, कामगार ,मजुर, तरूण व जनसामान्याकडून अदयापही प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असल्याचे निर्देशनास येत आहे.विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत मोडल्या गेलेल्या अनेक नास्ता हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवेपुरतेच र्मयादित ठेवण्याचा निर्णय असतांना अनेक ठिकाणी सर्रास लोग चक्क हॉटेलमध्येच नास्त करतानां दिसून आले. तर गल्ली बोळातील अनेक दुकानांना परवानगी नसतांना अशी सर्व दुकाने बिनधास्तपणे खुली असल्याचे सुध्दा यावेळी दिसून आले. त्यामुळे नेमके लॉकडाऊन आहे की नाही असा संभ्रम अनेकांमध्ये निर्माण झाला होता.७ एप्रिल रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३४४ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी ५0 हजार ७२२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ४७ हजार ६१ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ४ रुग्णांना आज मृत्यू झाला असून आतापर्यत ६९२ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. जिल्हयात २ हजार ९६९ इतके एॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.जिल्हयात मृत्यू दर हा १.३९ इतका असुन रिकव्हरी रेट हा ९२.७८ इतका आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!