अमरावती : जिल्हयात २८८ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत ४८ हजार ९२३ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत ६७७ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. ३ हजार पेक्षा जास्त एॅक्टिव्ह रुग्ण असून ४४ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असून अमरावती जिल्हयात देखिल कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांचा आकडा हा दिवसेदिवस वाढत असल्यामुळे जिल्हयातील मृत्यू दर हा १.३८ वर पोहोचला आहे.प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन करतांना अदयापही अनेकामध्ये जबाबदारीची जाणीव दूर्लक्षीत झाल्याचे दिसून येत आहे.कोरोनाचा रुग्णांचा नागपुर येथे उद्रेक झाला असतांना त्याचा परिणाम हा अमरावतीमध्ये दिसून येवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा येणार्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.१ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात २८८ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्हयात आतापर्यत ४८ हजार ९२३ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे.३ रुग्णाचा आज मृत्यू झाला असून आतापर्यत ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४४ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ३ हजार पेक्षा जास्त एॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्य़ात २८८ कोरोना पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
Contents hide