अमरावती: अमरावती महानगरपालिकेमध्येा कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच कोविंड रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणारी बेड संख्या तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून मा. आयुक्त प्रशांत रोडे यांनी मनपा क्षेत्रातील, कमी लक्षणे असलेली, लक्षणे नसलेली अशा प्रकारची कोरोनाग्रस्त रुग्णाडसाठी होम आयसोलेशन सुविधा पुरवण्यात आली, होम आयसोलेशन साठी अटी व शर्ती तयार करण्यात आल्या व त्यानुसार गेल्या वर्षभरापासून वीस हजाराहून जास्त रुग्णांनी या सुविधेचा उपयोग केला प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले मा.जिल्हाधिकारी श्री.शैलेश नवाल व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी वेळोवेळी रुग्णांच्या बाबत दैनंदिन स्वरूपात लक्ष ठेवण्यासाठी वेबसाईट स्वरूपामध्ये सुविधा सुरू केली त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी ३0 शिक्षकांची, एक टीम तयार केली, जी टीम दररोज रुग्णांना संपर्क करते त्यांचे ताप नियंत्रण, ऑक्सिजन लेवल, इतर काही समस्या असेल तर विचारणा करते व वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्यांना उपाय सुचवले जातात याकरिता कॉल सेंटर नंबर हेल्पलाइन नंबर, व्हाट्सअप नंबर इत्यादी द्वारे, सर्व प्रकारे कोरोना रुग्णांना व अमरावतीकरांना कोविड रुग्णालय सेंटर लसीकरण सेंटर इत्यादी बाबत माहिती दिली जाते तसेच दर पंधरा दिवसांनी मा.जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मा.आयुक्त प्रशांत रोडे स्वत: होम आयसोलेशन सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करतात व काम करणार्या सर्व कर्मचारी अधिकारी यांचे मनोधैर्य वाढवतात व काम करण्याची प्रेरणा तयार करतात वास्तविक पाहता जिल्हाधिकारी, मा.आयुक्त ज्या पद्धतीने अमरावती वासीयांसाठी काम करीत आहेत, त्यांचे एनर्जी हीच आमची प्रेरणा ठरत आहे.
जिल्हाधिकारी यांची होम आयसोलेशन व कोरोना नियंत्रण कक्षाला भेट
Contents hide