जिल्हय़ात ५ रुग्णांचा मृत्यू, ३७८ पुन्हा पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्हयात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ८ एप्रिल रोजी जिल्हयात ३७८ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात आतापर्यत ५१ हजार १00 कोरोनाग्रस्तांची नोद करण्यात आली आहे. ५ रुग्णांचा आज दिंनाक ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला असून आतापर्यत ६९७ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. ४७ हजार ५१७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. २ हजार ८८६ एॅक्टिव्ह रुग्ण असून जिल्हयात रुग्णांच्या बरे होण्याचा रिक्व्हरी रेट हा ९२.९९ इतका आहे.
गेल्या दोन दिवसापासुन जिल्हयात कोरोना रुग्णाचा आकडा ३00 पार असून मृतकांच्या संख्येत देखिल मोठी वाढ पहावयास मिळत आहे.जिल्हयात लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी अनेक नागरिक हे बिनधास्तपणे फिरत असून बरचेसे व्यावसाईक देखिल प्रशासनाच्या आदेशाला हुलकावणी देत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहे.विशेष म्हणजे वातावरणात दमट पणा असल्यामुळे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्यामुळे शहरी तसेच ग्रामिण भागात सर्दी,खोकला,ताप या सरख्या रोगाचे लक्षणे अनेक नागरिकांमध्ये जाणवु लागली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडादेखील वाढत असून सरकारी तसेच खासगी रुग्णालयामध्येदेखील रुग्णांची भरगच्च गर्दी पहावयास मिळत आहे.८ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३७८ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ५१ हजार १00 रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.४७ हजार ५१७ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून २ हजार ८८६ इतके रुग्ण एॅक्टिव्ह आहेत.५ रुग्णाचा आज मृत्यू झाला असून आतापर्यत ६९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.९२ .९९ इतका रिकव्हरी रेट असुन १.३८ इतका मृत्यू दर आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!