अमरावती : जिल्हयात २२७ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यत ४९ हजार १९८ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दि. २ एप्रिल रोजी ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत एकूण ६८१ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.३ हजार १५१ एॅक्टिव्ह रुग्ण असून ४५ हजार ३६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ९२.२१ रिकव्हरी रेट असून १.३८ इतका मृत्यू दर आहे.
जिल्ह्य़ात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असून कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णामध्ये देखील मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्हयात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लॉकडाऊनचे निर्बंध कडक शिथील करण्यात आले आहे.बाजारपेठामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंधन होत असल्याचे दिसून येत आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लॉकडाऊन संबंधित कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलल्या जात आहे.अमरावती जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. २ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात २७५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४९ हजार १९८ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ४ रुग्णांचा आज मृत्यू झाला असुन आतापर्यत ६८१ रुग्णहे कोरोनामुळे दगावले आहे.३ हजार १५१ एॅक्टिव्ह रुग्ण असुन ४५ हजार ३६६ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्य़ात ९२.२१ इतका रिकव्हरी रेट असून १.३८ इतका मृत्यू दर आहे.
जिल्हय़ात ४ रुग्णांचा मृत्यू, २७५ पॉझिटिव्ह
Contents hide