• Sat. Jun 3rd, 2023

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपयर्ंत देशात ६ कोटी २४ लाख 0८ हजार ३३३ लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. मोहिमेच्या ७४ व्या दिवशी म्हणजेच, ३0 मार्च रोजी मंगळवारी एकाच दिवशी सायंकाळी ७ वाजेपयर्ंत १२ लाख ९४ हजार ९७९ लसीचे डोस देण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ८२ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५२ लाख 0७ हजार ३६८ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

तसेच पहिल्या टप्प्यात ९0 लाख 0८ हजार ९0५ कोरोना योद्ध्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर ३७ लाख ७0 हजार ६0३ कोरोना योद्ध्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ६0 वर्षांहून अधिक वयांच्या २ कोटी ९0 लाख २0 हजार ९८९ ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर याच गटातील ३६ हजार ८९९ जणांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर आजारांशी लढा देणार्‍या ४५ ते ६0 वर्षांच्या ७१ लाख ५८ हजार ६५७ जणांना कोरोना लसीचा पहिला तर ४ हजार ९0५ जणांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये जाऊन लस घेता येऊ शकते. सरकार केंद्रांवर लस मोफत दिली जात आहे. तर खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीच्या एका डोससाठी २५0 रुपये शुल्क आहे. दुसरा डोस घेण्यासाठीही खासगी हॉस्पिटल्समध्ये शुल्क द्यावे लागेल. कोरोनावरील लस घेण्यासाठी आपण ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. लसीकरणासाठी कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी सरकारी वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून आपली अपॉइंटमेंट बुक करता येईल. या वेबासाइटवर दिवसाला १ कोटी नोंदणी स्वीकारल्या जातात. नोंदणी झाल्यावरच तुम्हाला लसीकरणाची तारी, वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळते.

ऑनलाइन नोंदणी करता येणे शक्य नसेल तर दुसरी व्यवस्थाही सरकारने केली आहे. कोरोनावरील लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी नसेल केली तर तुम्ही कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणी करून लस घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला दुपारी ३ वाजेनंतरच केंद्रावर जाता येईल. त्याआधी नाही. कोरोनावरील लसीकरणासाठी तुम्हाला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र सोबत न्यावे लागेल. याशिवाय पासपोर्ट, रेशनकार्ड आणि बँकेच्या पासबुकनेही तुम्ही आपली ओळख दाखवू शकता. यानंतर नोंदणी केली जाईल.
बेवसाईट ओपन केल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक टाका आणि ओटीपीवर क्लिक करा. आपल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी लिहा आणि क्लिक करा. आता नोंदणीसाठी एक पेज ओपन होईल. तिथे आपल्याला फोटो आयडीचा प्रकार, संख्या आणि आपले नाव लिहावे लागेल. आपल्याला वय आणि लिंगही नमुद करावे लागेल.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *