• Wed. Jun 7th, 2023

गुढीपाडव्याला मिरवणुका, बाईक रॅली काढण्यास बंदी

मुंबई:राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सध्या राज्यात कडक निबर्ंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार लोकांना मास्क लावण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केल आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचे सावट असून ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गुढीपाडवा सणाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली प्रसिद्ध केली आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पयर्ंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. साडेतीन मुहरूतांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहरूतावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते, परंतु कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापार्‍यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहरूत, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहरूतावर खरेदीची व्यापार्‍यांना आशा होती. मात्र बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपयर्ंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *