• Wed. Jun 7th, 2023

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार ज्योतिबाचा भव्य राज्याभिषेक सोहळा

मुंबई : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी नव्या संकल्पांचा आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ होतो. स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतही नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहरुतावर ज्योतिबाचा राज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. आजवर ज्योतिबाच्या कथा-कहाण्या आपण ग्रंथांमधून वाचल्या आहेत. पण दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या रुपात ज्योतिबाचे महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. गुढीपाडवा विशेष भागातून ज्योतिबाचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.
रंगणार भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा

मालिकेतल्या या भव्यदिव्य राज्यभिषेक सोहळ्याविषयी सांगताना ज्योतिबाची भूमिका साकारणारा विशाल निकम म्हणाला, ज्योतिबाची भूमिका साकारणं हेच मुळात माझ्यासाठी स्वप्नवत आहे. आता मालिकेत ज्योतिबाची राजा व्हायची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचा राज्याभिषेक होणार आहे. या विशेष भागासाठी आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. भव्यदिव्य सेटसोबतच, नयनरम्य रोषणाई, भरजरी वस्त्र, दुधाचा अभिषेक असा राजेशाही थाट असणार आहे. या भूमिकेच्या निमित्ताने हा सारा थाट मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. असं तो म्हणाला कोरोनाचा धोका वाढत असल्याने सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. ज्योतिबाच्या आशीर्वादाने सगळे निर्विघ्नपणे पार पडत असल्याने टीमचा उत्साह कायम आहे. तर मालिकेच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने ज्योतिबाच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होता येणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *