• Wed. Sep 20th, 2023

खरेदी इयर रिंगची

पेहराव कितीही सुंदर असला तरी त्याला साजेशा अँक्सेसरीजमुळे लूक अनेक पटीने उजळतो हे कोणीही नाकारणार नाही. या धर्तीवर पाहता भारतीय असो की पाश्‍चात्य, या दोन्ही प्रकारच्या साजेसे कानातले नखरा खुलवून जातात. मात्र इयररिंग खरेदी करताना चेहर्‍याचा आकारही लक्षात घ्यावा. उदाहरणार्थ चेहरा गोल असेल तर तो लंबुळका भासवण्यासाठी ओव्हरसाईज इयररिंग छान दिसतात. चौकोनी चेहरा असणार्‍या सखींनी रुंद इयररिंग वापरु नये. या महिलांनी झुमके वापरावे. या चेहर्‍याला हेवी इयररिंग अधिक सूट करतात. टॉप्सही शोभून दिसतात. आयताकृती चेहरा असल्यास जॉ लाईन शार्प आणि हनुवटी गोलाकार असते. या महिलांनी स्टड्स वापरणं योग्य ठरतं. त्या चंक स्टड्स, बटन अथवा राऊंड स्टड्सही वापरु शकतात. या बाबतीत ओव्हल शेप चेहरा असणार्‍या महिला लिक असतात. या चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारच्या इयररिंग्ज शोभून दिसतात. चेहरा दीपिकासारखा हार्ट शेपचा असेल तर त्रिकोणी, काहीशा रुंद इयररिंग्ज तुमच्यासाठीच बनल्या आहेत हे लक्षात घ्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,