• Wed. Sep 20th, 2023

कोरोना संपणार.!

कोरोना आला आणि सर्वांच्या मनात भीतीमय वातावरण निर्माण करीत वाटचाल करता झाला. त्यातच या कोरोनानं अनेकांचे बळी घेतले आणि तो घेतच आहे. तो चीनमधून आला असला तरी आजही अख्खं जग त्याच्यामुळं धास्तावलं आहे. तसा तो फारच आग ओकत असल्याचे दिसते. कोरोनावर औषधी कंपनींनी औषधीही काढली आहे. पण कोरोना त्या औषधालाही घाबरायला खाली नाही. ज्याप्रमाणे आज आपण कोरोनावर औषध काढली. त्यालाच प्रतिबंध म्हणून कोरोनानं आपलं रूप बदलवलं व तो नवीन स्वरुपात खुलेआम वावरतो आहे. कोणाला न भीता. त्यामुळं तो न संपण्याची चिन्ह दिसत आहेत.
माणसे पाप करीत होते. कोणी कोणाला विनाकारण लुटत होते. कोणी कोणाचे गळे दाबत होते. कोणी बलत्कार करीत होते. कोणी कोणाच्या मालमत्ता दाबत होते. कोणी कोणाची जीवही घेत होते. महत्वाचं म्हणजे हे पाप करतांना माणसे नातेसंबंधही पाहात नव्हते. पाप करतांना माणसाला पुढला संभाव्य धोकाही दिसत नव्हता. तो आंधळा झाला होता. काही तर म्हणत होते. हे पापपुण्य म्हणजे काय? काहीही पाप नसतं. पुण्यही नसतं. आजही असे काही महाभाग पापच करीत आहेत. ते कोणाला घाबरत नाही. कारण त्यांना आजही वाटतं की हे पाप कोणाला दिसत नाही. आजही असं पाप घडतं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पाप हे घडत होतं. जे माणसाला दिसत नव्हतं. ते निसर्गाला दिसत होतं. अलिकडं देव नाही असे मानणारे बरेच लोक आहेत. ते देव मानत नाहीत. त्यामुळं त्यांच्यामध्ये भीती नावाची गोष्टच नाही. पण जे पाप……आपलं पाप……..जे आपल्याला दिसत नाही, ते पाप निसर्ग पाहात असतो, त्याला ते सगळं दिसतं. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो. कोणी त्याला अल्ला म्हणतात, कोणी देवही संबोधतात. ह्याच निसर्गानं कोरोना नावाचा आपला एक दूत पृथ्वीवर पाठवलाय. जे पृथ्वीवर पापाचं वजन झालं आहे, त्या पापाची छाटणी करायला नव्हे तर ते पाप संपवायला. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पण गव्हाबरोबर सोंडाही भरडल्या जातो ना. तशीच आज काही पुण्यवानही या कोरोनाच्या कहरात मरत आहेत.
मृतकांची संख्या वाढत आहे. सगळे सुरक्षा बाळगून आहेत. काही तर चक्क संदूकात सीलबंद असल्यागत घरातच राहून काळजी घेत आहेत. कोणी काचेच्या महालात. जिथे हवेला शिरायलाही जागा नाही. अशीही कोरोनाच्या धास्तीनं जागा नव्हे तर पूरक वातावरण काहींनी आपल्या सभोवती संरक्षक भिंत म्हणून तयार केली आहे. पण कोरोना काही त्यांचं ऐकतो काय, तो त्याही व्यक्तीपर्यंत जात आहे आणि त्याला बाधीत करीत आहे. कारण तो पापाचा भागीदार आहे. तशी एक दंतकथा प्रचलीत आहे.
एक राजा होता. त्याला एका ज्योतीषानं सांगीतलं की तू आजपासून सातव्या दिवशी एक साप चावून मरणार. मग काय राजा घाबरला. त्यानं आपल्याला मृत्यू येवू नये, म्हणून आपल्याभोवती संरक्षक काचेची भिंत बांधली. जिथं हवेलाही प्रवेश नव्हता. कोणी विनामंजूरीनं त्याच्या कम-यात प्रवेश करु शकत नव्हता. त्यातच त्याचं जेवनही तपासून त्याला दिलं जात होतं. पण निसर्ग तो……..त्या राजाचे पाप पुर्ण झाले होते की काय, आज सातवा दिवस होता. तपासणारे थकले होते. त्यांना त्या राजाबद्दल हसू वाटायचं. त्यातच एक लहानशी अळी बोराच्या आतमध्ये शिरली. तपासणा-यानं बारकाईनं तपासलं नाही व ती अळी आतमध्ये गेली. मग काय, राजानं बोराला स्पर्श केला. ते बोर खाण्यासाठी त्याला फोडलं तर ती अळी बाहेर पडली. ती मोठी झाली. ती एवढी मोठी झाली की तिचा आकार सापासारखा दिसू लागला. तिनं राजाला दंश केला व राजा मरण पावला.
अशीच एक कथा महाभारतातही आहे. आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार. तसा कंस स्वगत म्हणाला,”आठवा ना. वेळ आहे. तो जन्म घेईल तेव्हा पाहू. तोपर्यंत अभय देतो देवकीला.” त्यातच दुसरी आकाशवाणी.
“तो देवकीचा आठवा पुत्र पहिल्या लेकराच्या रुपानं जन्माला आला तर……..” आता कंस घाबरला. काय करावे सुचेनासे झाले. शेवटी त्यानं देवकेला कारागृहात टाकलं व तिचे सहाही लेकरं मारले.

महत्वपूर्ण गोष्ट ही की कोणी कितीही संदूकात सीलबंद जरी राहिला तरी कोरोना त्याचेजवळ पोहोचणार नाही कशावरुन? किती प्रमाणात तुम्ही काळजी घ्याल. असे म्हणत काही माणसं बिनधास्त फिरत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हाट्सअपवर गाजत आहे. कोणी खर्रा खाल्ला म्हणून मास्क वापरला नाही असं म्हणत आहे. तर कोणी चेह-यावरचा मेकअप मिटतो म्हणून मास्क वापरला नाही असे म्हणत आहे. कोणी मिशी वाकडी होते म्हणून मास्क वापरला नाही असे म्हणत आहे. कोणी पायी चालत आहो ना, गाडीवर मास्क वापरावा असे म्हणत आहे. परंतू मला हे म्हणायचे आहे की कोरोना दस्तक देवो की न देवो. कदाचित कोरोना त्या तरुणांना शिवतही नसेल कदाचित. कारण त्यांचं मन निरोगी असेल, त्यांच्यात प्रतिकार शक्ती जास्त असेल, पण त्यांच्यारुपानं जो कोरोना इतरांमध्ये पसरतो ना. ते बरोबर नाही.
आज सरकार लाकडाऊन लावतं. कशासाठी? तर कोरोना संपावा म्हणून. तरीही मजूर वर्ग बिनधास्त बाहेर पडत आहे. त्या वर्गाला वाटते की आपल्याला कोरोना काय, कोणताही आजार शिवणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण त्यांची प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्यांनी बहुतःश पापही केलेलं नसतं. कोणाची मनंही दुखावली नसतात. म्हणून कोरोना शक्यतोवर त्यांना शिवणारच नाही. पण ह्या कोरोनाचे ते नक्कीच वाहकही ठरु शकतात. त्यांच्याच शरीरावरुन ते कोरोनाचे जंतू पसरु शकतात हे काही नाकारता येत नाही.
विशेषतः कोरोना कोणाला छळतो. कारखान्याचे जे मालक असतात. ते मालक आपल्या मजूरांवर अत्याचार करीत असतात. ते मात्र एसीच्या कम-यात असतात. घरात काम करणा-या मोलकरणीवर घरातील लोकं अत्याचार करतात. ते स्वतः एसीत असतात. सरकारी कार्यालयात कर्मचा-यावर अधिकारी अत्याचार करीत असतात. मात्र ते स्वतः एसीत बसतात. सरकारी योजनेची घोषणा करणारे मंत्री शेतकरी, श्रमीकावर अत्याचार करतात, ते स्वतः एसीत फिरतात. तसेच लहानशा प्रमाणपत्रासाठी दररोज शाळेत येणा-या चिमुरड्या मुलांवर शाळेत जाण्यासाठी तगादा लावणारे पालक तसेच शाळेत येण्यासाठी तगादा लावणारे शिक्षक, जे मुलांचं स्वातंत्र्य हिरावतात. कोरोना त्या मुलांना होत नाही. त्याच्या पालकांना व शिक्षकांना होतो. कारण याच घटकांकडून या निरागस मनावर अत्याचार होतो.
कोरोना संपणारच. कधीतरी संपणारच. कारण जो जन्म घेतो, तो मरणारच. अर्थात कधीतरी संपणारच. हा निसर्गनियम आहे. तेव्हा महत्वाची गोष्ट ही लक्षात घेण्याजोगी आहे की आपण आजपर्यंत जेही काही केलं, ते सर्व विसरुन जावे. चांगले वागावे. आपले विचार चांगले बनवावे. षडविकार आपल्यातून काढून टाकावे. दुस-याबद्दल चांगली भावना ठेवावी. दयाभाव ठेवावा. आदर बाळगावा. दुस-या व्यक्तीबद्दल चांगूलपणा बाळगावा. तो शत्रू का असेना. तसेच माणूसकी बाळगावी. मास्क वापरावा. जेवनापुर्वी हात स्वच्छ धुवावे. कोणीही अत्याचार करु नये. अत्याचाराचा भावच मनात आणू नये. निंदानालस्ती करु नये. मनात भीती, राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर ठेवू नये. असे जर तुम्ही वागले तर कोरोना हरेल व तो आल्यापावली निघून जाईल. पण हे प्रत्येकानं करण्याची गरज आहे, एकानं नाही. कारण कोरोना व्हायरस हा एक निसर्गदत्त जंतू आहे. या जंतूला जेवढे तुम्ही घाबराल, तेवढा हा सतावणारच आहे. त्यासाठी औषध म्हणजे स्वतःच्या मनात चांगूलपणा आणून तो चांगूलपणा आत्मसात करण्याची गरज आहे. आपण पाहात आहोत की कोरोना औषध निघाल्या. तरी कोरोना संपायचं नावच घेत नाही. तो अजून वाढत आहे. कधी नव रुप घेवून येत आहे. तर कधी त्याच रुपात कहरचा वर्षाव करीत आहे. मात्र आपण आता कसं वागावं हे आपल्यावरच अवलंबून आहे. हे तेवढंच खरं आहे.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,