मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. राज्य सरकार कोरोनाशी दोन हात करताना नवे नियम लावत आहे. याचा त्रास सर्वांचा होतो, पण संकटच असे आहे की आपल्याला दोन हात केले पाहिजेत. परिस्थिती गंभीर आहे, पण आपण धैर्याने सामोरे जावू, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.
कोरोनाचे संकट मोठ आहे. कोरोना घालविण्यासाठी केंद्र सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारला मदत करत आहे. कालच मी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या संकटात केंद्राचे आरेग्य खाते राज्याच्या पाठीशी असेल. त्यांची मदत आणि सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचे आहे.
आपल्यावर बंधने आणली की अस्वस्थता येते, शेतकरी, कामगार, व्यावसायिक, हमाल, कष्टकरी, व्यापारी यांना संकटामुळे झळ बसली आहे. दुकाने बंद झाल्याने व्यापार्यांचे नुकसान होत आहे. शेतकर्याला आपल्या मालाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांचेच अपरिमित नुकसान होत आहे.
कोरोना संकटाला धैर्याने सामोरे जाऊ-शरद पवार
Contents hide