जगभरात वाढत्या कोरोना प्रकरणांचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. त्याचा परिणाम भारतातही दिसून आला. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पाच दिवसानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत.
मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत २२ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत २३ पैशांची कपात करण्यात आली. त्यात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल आता प्रतिलिटर ९0.५६ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८0.७ रुपये आहे. राजस्थानमधील गंगानगरमध्ये अजूनही पेट्रोल शंभर रुपयांच्या वर आहे. पेट्रोल प्रतिलिटर १0१.0१ रुपये तर डिझेल ९२.९६ रुपये प्रति लिटर मिळत आहे. आर्थिक पुनप्र्राप्तीची चिंता वाढते आहे. इजिप्तच्या सुएझ कालव्यात मोठे मालवाहू जहाज अडकल्याचा परिणामही कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला होता. आता कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे जगभरातील आर्थिक पुनप्र्राप्तीतील मंदीविषयी चिंता वाढली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी निबर्ंध घातल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी जागतिक पातळीवर कमी होण्याची अपेक्षा आहे. कच्चे तेल ६५ डॉलर प्रतिपिंपाच्या खाली आले आहे.
कोरोना वाढला, तेल उतरले
Contents hide