- पापळलासूर्य /जगी उगवला//
- तम दूर केला/ कृषकांचा //१//
- विद्येचे नयन /संस्थेतून दिले//
- अश्रुही पुसले /कृषकांचे//२//
- ज्ञानाची ही गंगा/कृषकांच्या दारी/
- शिक्षण पायरी / घरोघरी//३//
- विद्यादान केले /ग्रामा नि ग्रामात//
- शिक्षणाची वात /पेटविली//४//
- कर्जलवादाचा /कायदा हा केला//
- कृषकांना दिला/ प्राण दान//५//
- कृषिमंत्रिपदी / योजना आखून//
- कृषक जीवन /सुखमय //६//
- कृषकांचे राजा/शेतकरी दाता//
- भूषण भारता /पापळचे//७//
- भाऊसाहेबांना/करितो नमन//
- करांनी वंदन/कोटी कोटी//८//
Contents hide
- अभंगकर्ता:- प्रा.अरुण बा. बुंदेले,
- अमरावती.भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- email:-arunbundele1@gmail.com