• Tue. Jun 6th, 2023

करजगावात वाचनालयाचा शुभारंभ ; प्रा. रमेश वरघट सरांचा स्तुत्य उपक्रम

    गौरव धवणे

अमरावती : आज-काल बहुतेक गावात कागदोपत्री ग्रंथालय आहेत, त्यात दरवर्षी हजारो रुपयांची पुस्तके आणलेली दाखवली जातात. मात्र ऑडिटपुरते, पुढचे काही वर्तमानपत्र पण लावली जातात ऑडिट करणार्याशीसुद्धा अर्थपूर्ण व्यवहार केला जातो, पण काही गावातील अपवाद सोडला तर बहुतेक गावात वाचनालय केवळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. ग्रामस्थांच्या वाचनाशी त्यांचा काडीमात्रही संबंध नसतो हीच परिस्थिती हेरून सेवानिवृत्त

    राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक रमेश वरघट

यांनी आपल्या गावात ग्रामस्थांच्या सेवेसाठी स्वखर्चाने दैनिक लोकमत दैनिक, देशोन्नती, सकाळ आणि पुण्यनगरी अशी चार वर्तमानपत्रे लावून दिली.
प्रा. वरघट यांचा उद्देश हाच की, दारव्हा तालुक्यातील करजगाव या जवळपास तीन हजार लोकवस्ती असलेल्या आपल्या गावात वाचन संस्कृती रुजवावी, ग्रामस्थांना आजूबाजूच्या जगाची माहिती मिळावी, लोकांचे मनोरंजन व्हावे, विरंगुळा व्हावा, ज्ञानवृद्धी व्हावी, विचारशक्तीला प्रेरणा आणि व्यक्तिमत्व विकास अशा अनेक उद्दात्त हेतूने एक एप्रिल चे औचित्य साधून गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने वाचनालयाचा शुभारंभ केला.
ग्रामपंचायतीकडे वाचनालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याकारणाने सरपंच आणि सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्याने, ग्रा. पं. सदस्य श्री. कृष्णाजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. रमेश वरघट यांच्या शुभहस्ते वाचनालयाचे उद्घाटन गावातील मुख्य रस्त्यावरील झाडाच्या पारावर सोशल डिस्टसींगचे पालन करून थाटात पार पडले. याप्रसंगी उपसरपंच रामेश्वर चव्हाण, भोयर गुरुजी, दिलीप राठोड, रामेश्वर चव्हाण, देविदास आडे आदी अनेक मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होती. नाट्यकर्मी शेषराव चव्हाण आणि रामेश्वर चव्हाण यांनी उपस्थितांना वाचनाचे महत्त्व सांगितले आणि चार पेपर्स प्राध्यापक वरघट सर यांनी तर एक पेपर विजय ढगे यांनी ग्रामस्थांच्या सोयीसाठी लावून दिल्याबद्दल देविदास आडे, आशिष जाधव, हरचंद नेणावत, कैलाश मोजरेता, अर्जुन चव्हाण, माधव चव्हाण, संतोष राठोड, ऊदल चव्हाण, अनिल राठोड, फत्तुसिंग चव्हाण, पुर्णाजी खेतावत, रामजीवन खेतावत, पांडुरंग ठाकरे, महादेव चव्हाण, हरू राठोड, निखिल वानखडे, कपिल वानखडे, सिद्धार्थ धवने यांनी प्रा. रमेश वरघट, विजय ढगे यांचे आभार व्यक्त केले.

विशेष उल्लेखनिय की, प्राध्यापक वरघट महाविद्यालयीन सेवेत असताना त्यांनी

    विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड कमी होण्याची कारणे शोधणे आणि त्यावरील उपाय

हा प्रबंध लिहिला. तसेच त्यांनी 2000 ते 2006 या काळात आपल्या महाविद्यालयात गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतः तसेच विद्यार्थ्याकडून दहा रुपये नाम मात्र वर्गणीतून विद्यार्थी वाचनालय सुरू केले होते. ते वास्तव्यास असलेल्या कारंजा लाड येथिल कोहिनूर काॅलनीच्या ठिकाणी त्यांनी वाचनालयाचा सुरू करण्याचा विचार केला होता, तो त्यांनी चांगल्या प्रतिष्ठितांना बोलून पण दाखविला होता, पण त्यांना सुशिक्षितांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. म्हणूनच त्यांनी आपल्याच गावातच वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला.

प्रा. वरघट हे 50,000 रूपयाची पुस्तके या वाचनालयास भेट देणार आहॆत. त्यांच्यासह करजगावच्या समूहातील सदस्य तथा सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी, हंजारीलाल जाधव, सेवानिवृत्त पीएसआय मधुकर चव्हाण, प्राचार्या निलिमा वरघट, कक्ष अधिकारी सतीश दवणे, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक अर्जुन वरघट, शास्ञज्ञ डाॅ. नंदकिशोर हिरवे आदि सदस्य यांनी जवळपास 1लाख रुपयांची पुस्तके वाचनालयायास दान देणार असल्याचे कबुल केले. तसेच वृत्तपत्र वाचनालयास पोहच करण्याची जबाबदारी पत्रकार संतोष राठोडने उचलली.
वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असता पत्रकार बंडूकुमार धवणे, पत्रकार संतोष राठोड, सतीश दवणे, यांच्यासह आठवणीतील करजगाव समूहातील सद्स्य, ग्रामस्थ यांनी त्यांच्या व विजय ढगे यांच्या स्तुत्य उपक्रमाचॆ कौतुक करून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *