मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले असून, लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलून त्यांना दिलासा देण्याबद्दल नव्याने अधिसूचना काढण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य सरकारच्या कडक निर्बंध नियमावलीच्या अंमलबजावणीवेळी मोठा गोंधळ उडाला. वीकेंड लॉकडाऊन सांगत राज्य सरकारने आणि तत्सम जिल्हाधिकार्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने उघडण्यास बंदी घातली होती. त्यामुळे, व्यापार्यांनी दुकानाबाहेर उभे राहून सरकारच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला. तसेच, वीकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण ३0 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, याला आमचा विरोध असल्याचे व्यापार्यांनी म्हटले होते. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन नियमावली जारी करण्याची मागणी केली आहे.
कडक निर्बंधांबाबत नव्याने अधिसूचना काढा
Contents hide