मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २0२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची कोविड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन, सदर योजनेला ३0 सष्टेंबर,२0२१ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे प्रमुख अनिल परब यांनी दिली आहे.
राज्य सरकार आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १00 टक्केपयर्ंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत मिळते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटी महामंडळाने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना हे स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नाही. तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने, सदर योजनेला पुढील सहा महिने, म्हणजेच ३0 सष्टेंबर,२0२१ पयर्ंत मुदतवाढ देत असल्याची माहिती मंत्री, परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
Contents hide