नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी आठवडाभरात केंद्र सरकार पगारवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचार्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली असून, २0 टक्क्यांपयर्ंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एलआयसीच्या कर्मचार्यांची यंदा पगारवाढ निश्चित मानली जात आहे. एलआयसी व्यवस्थापनाने कर्मचार्यांच्या २0 टक्के वेतन वाढीची शिफारस अर्थ मंत्रालयाला केली असून, येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच एलआयसीच्या अध्यक्षांची युनियनच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा झाली. यात व्यवस्थापनाने दिलेल्या वेतन वाढीच्या प्रस्तवाची माहिती दिली.
मागील वेळी १७ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. याशिवाय गृहकर्जावर १ टक्का कपातीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यंदा मात्र एलआयसी कर्मचार्यांना १८.५ टक्के ते २0 टक्क्यांच्या दरम्यान पगारवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलआयसीच्या कर्मचार्यांचा १ ऑगस्ट २0१७ पासून वेतनवाढ झालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निगुर्तंवणूक योजनेंतर्गत एलआयसीमधील हिस्सा विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. आगामी काही काळात एलआयसीचा पीओ येणार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीओतील १0 टक्के हिस्सा एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
एलआयसी कर्मचार्यांसाठी गुड न्यूज! २0 टक्के पगारवाढ होणार
Contents hide