नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
रमण यांची भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, २४ एप्रिल रोजी ते पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २0२२ रोजीपयर्ंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया मार्चमध्येच सुरू केली होती. केंद्र सरकारने सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते.
एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश
Contents hide